कारगिल विजय दिवसानिमित्त साक्षरा पॅराडाईज इंग्लिश शाळेत देशभक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगम
सेन्स फाउंडेशन आणि साक्षरा पॅराडाईज इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशभक्ती व आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे डायरेक्टर व निवृत्त सुभेदार मेजर मनोहरराव पेंडके यांचा सन्मान सन्मानपत्र प्रदान करून करण्यात आला. देशसेवेमधील त्यांचे योगदान, त्याग व राष्ट्रनिष्ठेचा गौरव करण्यासाठी हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले विद्यार्थ्यांसाठी आयोजित निशुल्क रोबोटिक्स वर्कशॉप, ज्यात आधुनिक विज्ञान व भविष्यातील तंत्रज्ञान याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेन्स फाउंडेशनचे नरेंद्र हिरुळकर यांनी केले. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी देशनिर्मितीत योगदान कसे देता येईल, यावर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी साक्षरा शाळेच्या स्थापनेतील मनोहर पेंडके सर, शुभम केवटकर सर आणि मुख्याध्यापिका कविता केवटकर मॅडम सह शाळेच्या निर्मितीमध्ये इतर सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रम व योगदान यांचा गौरव केला. तसेच, सेन्स फाउंडेशनमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देण्याचे कार्य कसे चालते, हेही सांगितले.
आपल्या मनोगतात मेजर पेंडके सर यांनी “देशसेवा हीच ईश्वरसेवा” ही भावना आयुष्यभर जपल्याचे सांगत, हाच विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.मुख्याध्यापिका कविता केवटकर मॅडम यांनी इनोव्हेटिव्ह एज्युकेशन ची आज खूप गरज आहे असे आपल्या मनोगतामध्ये सांगितले तसेच कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी शाळेत कार्यक्रम घेतल्याबद्दल सेन्स फाउंडेशनचे आभार मानले.
सेन्स फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पाचकवडे यांनी सांगितले की कारगिल मधील शौर्यविरांचे हौतात्म नेहमी लक्षात ठेवावे आणि देशाच्या प्रति आपलेही काही कर्तव्य आहे हे जाणून देशबांधणी मध्ये हातभार लावावा. साक्षरा शाळेमध्ये कार्यक्रम करू दिल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांनी शाळेचे आभार मानले.
कार्यक्रमामध्ये कारगिल युद्धातील शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच नुकतेच दिवंगत झालेले शाळेचे मार्गदर्शक श्री भटकर सर यांनासुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रोबोटिक्स वर्कशॉप मध्ये अमित सावळकर सरांनी “रोबोटिक्स म्हणजे काय?”, त्याचे भाग, आणि त्यातील करिअर संधी यावर प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी तेजस लांजेवार सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष रोबोटिक्स डेमो सादर करण्यात आला.
कार्यक्रमात पूजा हिरुळकर आणि सुषमा खाडे यांनी संस्थेचे प्रेरणादायी गीत “हमारी मुठ्ठी में आकाश सारा” सादर केले. चैताली पाचकवडे मॅडम यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन हर्षल खाडे (सचिव), नितीन बेराड (उपाध्यक्ष), शैलेश बोरकर, अथर्व अस्टोनकर, तसेच शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी केले. संचालन सुनिता उपाध्ये मॅडम यांनी केले.
विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि विज्ञान यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अंतराळ विज्ञान जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
“आकाश फक्त पाहण्याचे नसून, ते समजून घेण्याचे आहे!”
सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या जयंतीनिमित्त, सेन्स फाउंडेशनच्या वतीने अंतराळ व विज्ञान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांना अंतराळ, ग्रह, उपग्रह, तारे आणि अंतरिक्ष प्रवास याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाबद्दल आत्मविश्वास आणि कुतूहल निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमात श्री विजय म. गिरूळकर सरांनी विद्यार्थ्यांना अंतराळाविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी पृथ्वीबाहेरचे जीवन, सूर्य-चंद्राचे वैज्ञानिक महत्त्व, अंतराळ संशोधनातील भारताचे योगदान, आणि विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात संधी कशा शोधाव्यात याबाबत अत्यंत सोप्या भाषेत उदाहरणांसह विवेचन केले. त्यांच्या संवादात्मक शैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि अनेकांनी प्रश्न विचारून संवादात भाग घेतला. गिरुळकर सरांच्या कार्याबद्दल संस्थेकडून शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री. विजय म. गिरुळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय कार्यक्रमात सरपंच संघटनेचे अध्यक्ष अजय घुले, माजी पंचायत समिती सदस्या साै. रश्मीताई अजय घुले, विद्यार्थ्यांना इनोव्हेटिव्ह एज्युकेशन वर मार्गदर्शन करणारे मनीषभाऊ नांदूरकर, विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग करणारे ब्रेन ब्रिक्सचे एज्युकेशनल कौन्सिलर अमित सावळकर, बीएसएनएल चे निवृत्त अभियंता पाटणे सर, चॅलेंज एडिटोरियल बोर्ड जी सी आय 2024 चे चेअरमन शिवाजी टेकाडे, रॉयल जल प्रायव्हेट लिमिटेड चे फाउंडर आणि सीईओ रितेश पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात निवा भूपा हेल्थ इन्शुरन्स अमरावती चे मॅनेजर स्वप्निल देशमुख यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वेदिका सुनील काळे हिचा ‘Rising Icon’ म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. तिने अत्यंत कठीण परिस्थितीतून सीए ची परीक्षा उत्तीर्ण करून विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. सेन्स फाउंडेशनने तिला प्रमाणपत्र देऊन गौरविले, ज्यामध्ये तिच्या समर्पण, शिस्त आणि चिकाटीचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित सावळकर यांनी आणि आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष संतोष पाचकवडे यांनी केले.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष नितीन बेराड, सचिव हर्षल खाडे, नरेंद्र हिरुळकर, शैलेश बोरकर, सुचल हुकुम, पूजा हिरुळकर, सुषमा खाडे, चैताली पाचकवडे वृषाली बेराड, अश्विनी हुकुम यांच्यासह अनेक सदस्य सहभागी होते. कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य सचिन महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली आणि संपूर्ण वातावरण विज्ञानमय झाले होते.
डॉक्टर्स डे निमित्त सेन्स फाउंडेशनतर्फे डॉक्टर्सना “Sense of Humanity” सन्मान
डॉक्टर्स डे निमित्त सेन्स फाउंडेशनच्या वतीने आदरणीय डॉक्टरांची सदिच्छा भेट घेण्यात आली आणि त्यांना “Sense of Humanity” हा सन्मान प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाचकवडे, सचिव हर्षल खाडे, मनीष नांदुरकर नरेंद्र हिरूळकर, शैलेश बोरकर, अथर्व अष्टूनकर आणि सार्थक पाखरे उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर तायडे सरांनी त्यांच्या २० वर्षांच्या वैद्यकीय प्रवासाचा अनुभव सांगताना आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून अनेक रुग्णांनी आरोग्यात सुधारणा अनुभवली असल्याचे नमूद केले. त्यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे.
डॉ. कावरे सरांनी ‘केअर इज बेटर दॅन क्युअर’ हे सूत्र सांगत निरोगी जीवनासाठी सुरुवातीपासूनच शरीराची काळजी घेण्यावर भर दिला.
डॉ. बारंगे सरांनी तरुण पिढीमध्ये वैद्यकीय क्षेत्राबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी समाजासाठी आणि रुग्णसेवेसाठी सातत्याने काम सुरू असल्याचे सांगत, “जीवनात यश मिळवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही,” असा मोलाचा सल्ला दिला.
डॉ. बगळे सरांनी सुद्धा फाउंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधला आणि समाजसेवा व यशाच्या प्रवासात योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळणे किती आवश्यक आहे, हे सांगितले.
या उपक्रमामुळे डॉक्टरांच्या कार्याचा गौरव होऊन समाजात जागरूकता निर्माण होण्यास हातभार लागला आहे.
सेन्स फाउंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
विद्यार्थ्यांनी आपली कुवत न लपविता आपल्या कुवतीनुसार शंभर टक्के प्रयत्न करावेत – जिल्हा परिषद, उप अभियंता अतुल रामटेके
बाेरखडे कोचिंग क्लासेस येथे सेन्स फाउंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा परिषद, उप अभियंता श्री. अतुल रामटेके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येकाने आपली कुवत ओळखून त्यानुसारच शंभर टक्के प्रयत्न करायला हवेत.”
श्री. रामटेके यांनी आपल्या जीवनातील अडचणींवर मात करत यश मिळवलेला प्रवास विद्यार्थ्यांसमाेर मांडला. त्यांनी महापुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहनही यावेळी केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपअभियंता (जलसंपदा) श्री. सुबोध पंडित यांनी सांगितले की, “ग्लॅमरच्या मागे न लागता, आपल्या परिस्थितीनुसार ध्येय ठरवून त्यासाठी मेहनत घ्यावी.” त्यांनीही आपल्या संघर्षमय जीवनाचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगून त्यांना प्रेरणा दिली.
कन्या आश्रम शाळा, गौरखेडा येथील मुख्याध्यापक श्री. शुध्दोधन मोहोड यांनी विद्यार्थ्यांना नेहमी मोठे स्वप्न बघण्याची प्रेरणा दिली. “लक्ष्य नेहमी मोठं ठेवलं, तर किमान लक्ष्य गाठण्यात तरी यशस्वी होता येईल,” असे त्यांनी नमूद केले.
बाेरखडे कोचिंग क्लासेसचे संचालक बोरखडे सर यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे “स्मॉल एम इज क्राईम”, हे वाक्य उद्धृत करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
या कार्यक्रमात प्रेरणादायी विचार, महान व्यक्तिमत्त्वांचे जीवनप्रवास आणि संघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कोषाध्यक्ष नरेंद्र हिरूळकर यांनी केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाचकवडे, सचिव हर्षल खाडे, हरिश देशमुख, अथर्व अष्टूनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तक,पेन भेट देण्यात आले. कार्यक्रमास बोरखडे कोचिंग क्लासेसचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि त्यांना मिळालेली प्रेरणा हे कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.
‘सेन्स फाउंडेशन’च्या स्नेह मिलन 2025 या आगळ्या-वेगळ्या
कार्यक्रमाचे निवेदन करताना नरेंद्र हिरूळकर यांनी फाउंडेशनच्या उगमाची आठवण करून दिली. एक वर्षापूर्वी काही उत्साही मित्रांच्या मनात समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार रुजला आणि त्यातूनच ‘सेन्स फाउंडेशन’चा जन्म झाला. या वर्षभरात अनेक नव्या सहकाऱ्यांची साथ लाभली आणि त्यांच्याच सहकार्यामुळे आज फाउंडेशन समाजाच्या सेवेत उल्लेखनीय कार्य करू शकले आहे.
कार्यक्रमात सेन्स फाउंडेशनच्या कार्याचा आणि वर्षभराच्या यशस्वी प्रवासाचा आढावा संस्थेचे अध्यक्ष संतोष पाचकवडे यांनी उपस्थितांसमोर सादर केला . त्याचबरोबर या प्रवासात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून
श्री. अतुल भडांगे (महिला व बाल विकास अधिकारी)
श्री. सचिन महाजन, उद्योजक
श्री. हरीश देशमुख, शासकीय कंत्राटदार
श्री. मयूर वाघ, उद्योजक
तसेच सागर बुटे (बांधकाम व्यावसायीक), सचिन माथुरकर ( उद्योजक),डॉ. निलेश पाचकवडे, डॉ. संदीप बुटे यांच्याही कार्याची दखल घेण्यात आली. कार्यक्रमास सेन्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष नितीन बेराड, सचिव हर्षल खाडे सुचल हकूम, सौरभ पाठक, आकाश मोहोड, शैलेश बोरकर, दिनेश अष्टूनकर, सागर जयस्वाल, अथर्व अष्टूनकर, अशोक बोरकर, शुभांगी अष्टूनकर,पूजा हिरूळकर, वृषाली बेराड, अश्विनी हुकुम, शितल टवलारे सहपरिवार उपस्थित होते.
या वेळी श्री. अतुल भडांगे यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी फाउंडेशनच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला. सागर बुटे यांनीही प्रेरणादायी शब्दांत संस्थेचे कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली पाचकवडे आणि सुषमा खाडे यांनी तर आभार प्रदर्शन विराज बाळेकर यांनी केले.
सेन्स फाउंडेशनचा मूलभूत उद्देश म्हणजे समाजात जे चांगलं आणि प्रेरणादायी आहे, ते पुढे आणणं.
‘स्नेह मिलन 2025’ हा कार्यक्रम म्हणजे त्याच उद्दिष्टाची एक सुंदर आणि प्रभावी झलक होती –
जिथे कृतज्ञता होती, सन्मान होता आणि नव्या संकल्पांना प्रोत्साहन देण्याची एक प्रेरणा होती.
गौरखेडा कुणबी येथील कन्या आश्रम शाळेत सेन्स फाउंडेशनच्या वतीने मोफत नवीन ड्रेस वाटप कार्यक्रम संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींना शिक्षणास चालना देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील मुलींनी कोणत्याही अडचणींना न घाबरता उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे प्रेरणादायी विचार यावेळी मांडण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार असलेल्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि शिक्षण घेण्याची इच्छाशक्ती दृढ होईल. समाजातील गरजू विद्यार्थिनींना मदतीचा हात देण्याचा हा स्तुत्य उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शुद्धोधन मोहोड, संस्थेचे अध्यक्ष संतोष पाचकवडे, सचिव हर्षल खाडे, नरेंद्र हिरूळकर तसेच शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.
परोपकाराची प्रक्रिया निरंतर सुरू राहिली तरच समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असे प्रतिपादन महिला आणि बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले. ते सेन्स फाउंडेशनतर्फे होलीक्रॉस येथील मुलींच्या बालगृहात आयोजित मोफत नवीन ड्रेस वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी सेन्स फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पाचकवडे यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ नवीन ड्रेस वाटप नाही, तर आत्मविश्वास वाढविण्याचे, नवीन प्रेरणा देण्याचे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखण्याचे एक पाऊल आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल.संस्थेचे नरेंद्र हिरुळकर यांनी उपस्थितांना सेन्स फाउंडेशनच्या उद्दिष्टांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण होते आणि त्यांना नवीन ड्रेस मिळाल्याने उत्साह वाटला.
कार्यक्रमाला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अमरावती कायदा तथा परिवेक्षा अधिकारी सीमा भाकरे (तायडे) तसेच सेन्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष नितीन बेराड, सचिव हर्षल खाडे, पदाधिकारी हरीश देशमुख, सचिन महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यकामाला समाज सेवक श्रीकांत बालटे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सेन्स फाउंडेशन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अमरावती यांनी विशेष योगदान दिले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सेन्स फाउंडेशन तर्फे समाजासाठी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विशेष गिफ्ट आणि सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.
संस्थेच्या वतीने हा उपक्रम महिलांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष अमरावती कायदा तथा परीक्षा अधिकारी एड. सीमा भाकरे, फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मधील महीला पाेलीस सोनाली रोही, महिला उद्योजिका दिपाली देशमुख इर्विन हॉस्पिटल येथील महिला सफाई कर्मचारी तथा अमरावती शहरातील प्रथम महिला आटो चालक सुप्रिया गजभिये यांचा सत्कार करण्यात आला. “स्त्री ही केवळ शक्ती नाही, तर परिवर्तनाची वाहक आहे” या विचाराने प्रेरित होत महिलांना समाजात सन्मान आणि संधी मिळाव्यात, यासाठी सेन्स फाउंडेशन कार्यरत आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संतोष पाचकवडे, उपाध्यक्ष नितीन बेराड, सचिव हर्षल खाडे, तसेच पदाधिकारी सचिन महाजन,हरीश देशमुख आणि नरेंद्र हिरूळकर उपस्थित होते.
सेन्स फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळाले असून, उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सामाजिक आणि व्यावसायिक योगदानाची दखल घेतली.
अमरावतीस्थित सेन्स फाउंडेशनने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. 7 ऑक्टोबर 2024 रोजी, तिवसा तालुक्यातील उच्च प्राथमिक शाळा, विरगव्हाण येथे फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना नि:शुल्क नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात प्रोत्साहित करणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे हा आहे. सेन्स फाउंडेशनच्या वतीने समाजातील दुर्बल घटकांसाठी सेवाभावाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संतोष पाचकवडे, सेन्स फाउंडेशनचे अध्यक्ष, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांवर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, “या भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, आणि सैन्यात अधिकारी बनून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना प्रचंड प्रेरणा दिली.
शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी सेन्स फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत पुढील सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळते. पोलीस पाटील गोपाल चव्हाण यांचेही कार्यक्रमात उपस्थित राहून दिलेले प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरले.
या उपक्रमात विशेष सहकार्य करणारे प्रमुख अतिथी नितीन तायवाडे, मयूर वाघ, आणि सागर जयस्वाल उपस्थित होते. त्यांच्या योगदानाबद्दल सेन्स फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या सहकार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष नितीन बेराड, सचिव हर्षवर्धन खाडे, तसेच नरेंद्र हिरुळकर, शैलेश बोरकर, शाळेतील शिक्षकवर्ग, आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सेन्स फाउंडेशनचा संदेश आणि उद्देश
सेन्स फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. संस्थेचा उद्देश केवळ आर्थिक मदत करणे नसून, समाजातील प्रत्येक घटकाला आत्मनिर्भर बनविणे आहे. या ड्रेस वाटप उपक्रमाने विद्यार्थ्यांना एक नवीन उर्जा आणि आत्मविश्वास मिळेल, याची फाउंडेशनला खात्री आहे.
सेन्स फाउंडेशन, अमरावतीच्या वतीने दिनांक 1 सप्टेंबर रोजी डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात नवीन ड्रेस आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून, दुर्बल घटकांच्या गरजांकडे लक्ष वेधण्यासाठी फाउंडेशनने एक पाऊल उचलले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष पाचकवडे, सेन्स फाउंडेशनचे अध्यक्ष, यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाजातील दुर्बल घटकांसाठी काहीतरी करणे हे आपले कर्तव्य आहे. या समाजात आपलेही देणे लागते, आणि त्यातूनच या सामाजिक कार्याची सुरुवात झाली.” त्यांनी समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या मूलभूत गरजांसाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख करत त्यांच्या मदतीसाठी सेन्स फाउंडेशनची वचनबद्धता स्पष्ट केली.
अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक इंगोले सर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि दैनंदिन जीवनात अशा प्रकारच्या मदतीची महत्त्वपूर्ण भूमिका कशी असते, यावर भर दिला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस आणि बिस्किट वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर आनंद झळकला. या उपक्रमात एसबीआय जनरलचे श्री स्वप्निल देशमुख, सेन्स फाउंडेशनचे सचिव हर्षवर्धन खाडे, आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे मोलाचे सहकार्य या उपक्रमाला लाभले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सेन्स फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीतून समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे वचन दिले आहे
प्रिय मित्रांनो,
“Society for Education, Nation Building, Social Services & Empowerment (SENSE) Foundation” ही संस्था आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. आमचा उद्देश शिक्षणाच्या प्रसारातून समाज सशक्त करणे, राष्ट्र उभारणीत योगदान देणे, आणि विविध सामाजिक सेवा उपक्रमांच्या माध्यमातून वंचित आणि दुर्बल घटकांना मदत करणे आहे.
आपली लहानशी मदतही समाजासाठी मोठा फरक करू शकते. आम्हाला दिलेल्या देणग्या विविध उपक्रमांमध्ये वापरल्या जातील
आपल्या आर्थिक मदतीने आपण आपल्या समाजाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलू शकता. कृपया या पवित्र कार्यात सहभागी व्हा आणि समाजसेवेसाठी हातभार लावा.
आपल्या सहकार्याने, आपण एक उज्वल भविष्य घडवू शकतो.
Bank Name - State Bank Of India
Account No - 43335568735
IFSC No. - SBIN0000311