Vision
To be the leading provider of transformative technologies, revolutionizing industries and enriching lives through our commitment to excellence and social responsibility.
Mission:
To empower individuals and businesses with innovative solutions that enhance productivity, simplify processes, and drive sustainable growth.
When India's constitution was made, and we got independence in a real sense. Let us respect the every day.
S – SOCIETY FOR
समाजामध्ये विविध विषयांवर जनजागरण करून प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणे आणि एका चांगल्या समाजाची निर्मिती करणे. घटनेमध्ये मूलभूत हक्क जसे दिले आहेत त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे समाज आणि देशाप्रती आपली काही कर्तव्य सुद्धा आहेत. त्या कर्तव्याची जाणीव करून देणे.
स्वातंत्र्य मिळाले म्हणजे ते कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळालेले स्वातंत्र असो; जसे मोबाईल, इंटरनेट वापरणे पासून तुम्हाला जास्त पगार किंवा पैसे कमवण्याची संधी मिळणे असो किंवा गाडी चालवण्यापासून मुक्तपणे कुणाशीही मैत्री किंवा संबंध ठेवायचे असो तुमची जबाबदारी जास्त वाढते. याविषयी समाजामध्ये जागरूकता करून प्रत्येकाला आपण या देशाचे समाजाचे देणे लागतो ही जाणीव निर्माण करून एक जबाबदार समाज निर्माण करणे.
E – EDUCATION
आर्थिक साक्षरता (Financial Awareness)
आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की चांगले जीवन जगण्यासाठी भरपूर पैसे कमवावे लागतात पण एका व्यवस्थित उत्पन्नाचे किंवा तुमच्या दररोजच्या एका किमान ठराविक उत्पन्नाचे व्यवस्थित नियोजन करणेकरिता समाजामध्ये आर्थिक व्यवस्थापनाविषयी जागरूकता निर्माण करून चांगले जीवन कसे जगता येईल याची जाणीव करून देणे.
सायबर सिक्युरिटी ( Cyber Security )
मोबाईल इंटरनेट वापरताना त्याचा चांगला उपयोग कसा करावा ? आणि सायबर क्राईमचा धोका कसा टाळावा ? याविषयी जनजागरण करणे.
हेल्थ अवरनेस (Health Awareness)
शरीर चांगले असले असेल तर सर्व काही चांगले त्यामुळे आरोग्य तपासणी (Health checkup), योगा, मेडिटेशन या विषयावर अवरनेस कॅम्प आयोजित करणे.
N - Nation Building (राष्ट्रनिर्माण)
- जास्तीत जास्त पालकांना आणि मुलांना जोडून एक सिविल सोसायटी तयार करणे. त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणि करिअरच्या नवीन संधी विषयी माहिती देणे.
Responsibility जबाबदारी
नागरिक, पालक, विद्यार्थी, मुलगा, नोकरदार, बिझनेसमॅन म्हणून आपली काय जबाबदारी आहे? याची जाणीव निर्माण करणे.
मुलांनी वाईट मार्गाकडे जाऊ नये याकरता पालकांनी सुद्धा वाईट मार्गाकडे जाऊ नये ही जाणीव निर्माण करणे. कारण मुले पालकांना फॉलो करतात आणि आज पालक जे करतात त्यापेक्षा आधुनिक व्यसन मुले भविष्यात स्वीकारतील याकरिता अवेअरनेस करणे. वाईट लोकांची एकजूट आहे संघटन आहे चांगल्या लोकांचे नाही म्हणून सिविल सोसायटी तयार करणे. आजचा तरुण वर्ग चुकीच्या लोकांना फॉलो करतो कारण त्याचे आदर्श तेच लोक असतात (जास्तीत जास्त भाईगिरी करणारे लोक). कारण हे लोक त्यांना चौका-चौकामध्ये फ्लेक्सवर दिसतात. पण चांगले लोकांचे विचार त्यांच्या सक्सेस स्टोरी तरुण पिढी समोर येत नाही त्यामुळे समाजाला चांगल्या आणि सक्सेसफुल लोकांच्या स्टोरीज, मुलाखत, व्हिडिओ यांचा जास्तीत जास्त प्रचार करून तरुण पिढी समोर त्यांचा आदर्श ठेवणे, त्यांचा सत्कार करणे. तसेच डिजिटल माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे.
S – SOCIAL SERVICES (सामाजिक सेवा)
बल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन लोकांना त्यांची ग्लोबल वार्मिंगच्या धोक्याची जाणीव करून देणे. त्याकरिता मार्गदर्शन करून कार्यक्रम आयोजित करणे. वृक्षारोपण करणे.
वाढत्या जनसंख्येचा धोका ओळखून पाप्यूलेशन कंट्रोलसाठी लोकांमध्ये जागरण करणे.
शेतकऱ्यांकरिता नवीन तंत्रज्ञान तसेच उत्पन्न वाढीकरता जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे.
विद्यार्थ्यांकरीता महिलांकरिता तसेच समाजाचे प्रत्येक घटकांकरिता स्पर्धा आणि खेळांचे आयोजन करणे.
समाजातील विविध क्षेत्रातील जसे पोलीस, राजकीय व्यक्ति, शासकीय कर्मचारी, कलेक्टर, व्यावसायिक यासारख्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींकडून महिला, शेतकरी, विद्यार्थी, पालक, व्यापारी यांचे करता संदेश घेऊन प्रसारण करणे.
E – Empowerment सक्षमीकरण
विविध प्रकारच्या कौशल्य विषयक ट्रेनिंगच्या माध्यमातून सक्षम समाजाचे निर्माण करणे.
शेतकऱ्यांकरिता शेती विषयक ट्रेनिंग चे आयोजन करणे.
बचत गटाकरता किंवा महिलांकरिता उत्पन्न वाढीसाठी नवीन व्यवसायाची माहिती देणे.
विशेषता मार्केटिंग विषयी उपयोगी किंवा मार्केटिंग मध्ये सुलभता येईल असे व्यवसायाचे मॉडेल उभे करणे.
आर्थिक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम समाजाची निर्मिती करणे.
मन,मनगट आणि बुद्धी या तिन्हींचा विकास म्हणजे सर्वांगीण विकास – स्वामी विवेकानंद
Our Team
Santosh Pachkawade
President
Nitin Berad
Vice-President
Harshwardhan Khade
Secretary
Narendra Hirulkar
Treasurer
Suchal Hukum
Joint-Secretary
Saurabh Pathak
Executive Member
Adv. Shubhangi Astunkar
Executive Member
Akash Mohod
Executive Member
Pooja Hirulkar
Executive Member
Sushama Khade
Executive Member
प्रिय मित्रांनो,
“Society for Education, Nation Building, Social Services & Empowerment (SENSE) Foundation” ही संस्था आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. आमचा उद्देश शिक्षणाच्या प्रसारातून समाज सशक्त करणे, राष्ट्र उभारणीत योगदान देणे, आणि विविध सामाजिक सेवा उपक्रमांच्या माध्यमातून वंचित आणि दुर्बल घटकांना मदत करणे आहे.
आपली लहानशी मदतही समाजासाठी मोठा फरक करू शकते. आम्हाला दिलेल्या देणग्या विविध उपक्रमांमध्ये वापरल्या जातील
आपल्या आर्थिक मदतीने आपण आपल्या समाजाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलू शकता. कृपया या पवित्र कार्यात सहभागी व्हा आणि समाजसेवेसाठी हातभार लावा.
आपल्या सहकार्याने, आपण एक उज्वल भविष्य घडवू शकतो.
Bank Name - State Bank Of India
Account No - 43335568735
IFSC No. - SBIN0000311