“रस्ते आता फक्त माणसांसाठी नाहीत…”
दक्षिण कोरिया सरकारने नुकताच असा कायदा मंजूर केला आहे, ज्यायोगे रोबोट्सना पादचारी म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे.
● ५०० किलोपर्यंत वजन असलेले रोबोट्स रस्त्यावर चालू शकतात
● १५ किमी/तास वेगाने चालण्याची परवानगी
● फक्त प्रमाणित आणि विमाधारक रोबोट्सच रस्त्यावर फिरू शकतात
दक्षिण कोरिया हा पहिला देश नाही – अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, यू.के., ऑस्ट्रिया यासारख्या देशांमध्ये रोबोट्स आधीच रस्त्यांवर उतरले आहेत.
नव्या युगाची सुरुवात
कधी काळी घोडागाड्या ते मोटारी असा बदल आपण अनुभवला. आज आपण अशाच एका बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. लवकरच आपल्यासोबत रस्त्यावरून झपाझप चालणारे, सामान वाहणारे, परिसर स्वच्छ करणारे किंवा सुरक्षा राखणारे रोबोट्स सहज दिसतील – आणि आपण त्यांना पाहून थांबणारही नाही!
तंत्रज्ञानाच्या या झपाट्याचा अर्थ काय?
-
स्मार्ट सिटी ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरते आहे
-
स्वयंचलित सेवांचा वापर वाढणार आहे
-
नव्या प्रकारच्या नोकऱ्या व कौशल्यांची गरज वाढेल
-
AI, Robotics आणि IoT हे शिक्षणाचे भाग बनतील
भविष्यासाठी सज्ज व्हा!
सेन्स फाउंडेशन चा विश्वास आहे की समाजातील प्रत्येक व्यक्तीने या बदलांची जाणीव ठेवून स्वतःला तंत्रज्ञानाच्या नव्या युगासाठी सज्ज करायला हवे. हे बदल केवळ शहरांपुरते मर्यादित नसतील – ते तुमच्या गावापर्यंत, तुमच्या दारापर्यंत येणार आहेत.
“भविष्य घडवण्यासाठी… भविष्याची ओळख असावी लागते!”
सेन्स फाउंडेशन
शिक्षण | सक्षमीकरण | तंत्रज्ञान जनजागृती
🌐 www.sensefoundation.in
Good👍
सर तुम्ही खूप छान माहिती दिली याबद्दल तुमचे धन्यवाद!!